आंतरराष्ट्रीय योगा दिन जाणून घ्या प्राणायामाचे प्रकार व त्याचे फायदे

मंगळवार, 19 जून 2018 (15:42 IST)
International Yoga Day 2018: 21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येईल. ज्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2015 पासून सुरू केली होती. योगात प्राणायामाचे फार महत्त्व आहे, याला योगाचे आठ अंगांमधून चवथा अंग असा देखील म्हटले जाते. हे फारच सोपे आणि फायदेशीर योगासन आहे. ज्याला कुठल्याही वयात, लिंग आणि वर्गाचा व्यक्ती आरामात करू शकतो. प्राणायाम करताना किंवा श्वास घेताना आम्ही तीन क्रिया करतो - पूरक, कुम्भक, रेचक. अर्थात श्वास घेणे, रोखणे आणि सोडणे. तर तुम्हाला प्राणायामाचे फायदे आणि प्रकार सांगत आहोत ...
 
योगात प्राणायामाचे बरेच प्रकार आहे, पण काही प्रमुख प्रकार या प्रकारे आहे -
नाडी शोधन प्राणायाम
उज्जयी प्राणायाम
कपालभाती प्राणायाम
भास्त्रिका प्राणायाम
शीतली प्राणायाम
डिग्र प्राणायाम
बाह्या प्राणायाम
भ्रामरी प्राणायाम
उद्गित प्राणायाम
अनुलोम- विलोम प्राणायाम
अग्निसर क्रिया
 
प्राणायामाचे फायदे
 
प्राणायाम फारच फायदेशीर योगासन आहे, जो संपूर्ण शरीराला स्वस्थ बनवतो...
 
प्राणायाम फुफ्फुसाला स्वस्थ आणि मजबूत बनवतो, ज्याने त्याची क्षमता वाढते.
प्राणायाम रक्तचाप सामान्य करतो आणि हृदय संबंधी आजारांना दूर करण्यास मदत करतो.
प्राणायाम पचन क्रियेला दुरुस्त करतो.
प्राणायाम ऑक्सिजनच्या प्रचुरतेद्वारे रक्ताला घट्ट करतो आणि मस्तिष्कच्या क्रियांना उत्तम बनवतो.
प्राणायाम तणाव कमी करण्याचा सर्वात उत्तम साधन आहे.
प्राणायाम वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती