०३ तास सलगपणे योग करत विश्वविक्रम लाँगेस्ट योगा मॅरेथॉन – फिमेल

मंगळवार, 20 जून 2017 (17:38 IST)

नाशिकमधल्या योग शिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सलगतब्बल १०३ तास सलगपणे योग करत विश्वविक्रम रचला आहे. ‘सर्वात दीर्घ योग मॅरेथॉन – महिला’ (लाँगेस्ट योगा मॅरेथॉन – फिमेल) असं त्यांच्या विक्रमाचं स्वरुप आहे.

इगतपुरीतल्या एका रिसोर्टमध्ये 16 जून, शुक्रवारी पहाटे साडे चार वाजता पाटील यांनी योग करण्यास सुरुवात केली. 18 जूनला म्हणजे रविवारी दुपारी एक वाजून 33 मिनिटांनी त्यांनी तामिळनाडूच्या के. पी. रचना यांचा सलग 57 तास 2 मिनिटं योग करण्याचा विक्रम मोडित काढला आहे .नाशिकच्या 48 वर्षीय योगाशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सतत १०० तास योगा करून एक नवा इतिहास रचण्याचा संकल्प केला होता. 
 


आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी सलग योगासनांचे शंभर तास पार केले.मात्र तरीही न थांबता त्यांनी १०३ तासाचा विक्रम पूर्ण करीत आपल्या या  विक्रमाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकोर्ड नोंद केली. यावेळी गिनीज बुकचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.

वेबदुनिया वर वाचा