हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद

मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (08:10 IST)
Major Dhyan Chand भारत ज्याला महापुरुषांची भूमी म्हण्टलं जातं त्याने ध्यानचंद सारख्या अनेक हिऱ्यांना जन्म दिला. 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहबाद (प्रयागराज) येथे राजपूत कुटुंबात ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. ह्यांचे मूळ नाव ध्यानचन्द सिंह असे आहे.
 
ह्यांनी अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी येथून शिक्षा घेतली आणि 1932 मध्ये ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं.
 
1922 मध्ये ध्यानचंद ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये शिपाई (खाजगी) झाले. वर्ष 1922 ते 1926 पर्यंत ध्यानचंद केवळ आर्मी हॉकी स्पर्धा आणि रेजिमेंटल खेळ खेळत असे. सैन्यात भरती होण्यापूर्वी त्यांनी कधी हॉकी खेळली त्यांना आठवत नव्हतं आणि त्यांचा हॉकीच्या बाजू झुकाव देखील नव्हता.
 
ध्यानचंद ह्यांची निवड न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार्‍या भारतीय आर्मीच्या टीमसाठी झाले होते. ह्याच्यात त्यांनी 18 सामने जिंकले, 2 अनिर्णित राहिले आणि फक्त 1 हरले. ह्याप्रमाणे त्यांना सर्व प्रेक्षकांकडून कौतुक मिळाले. 1927 मध्ये भारतात परतल्यावर ह्यांची 'लान्स नायक' म्हणून बढती झाली.
 
17 मे 1928 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये पहिल्यांदाच भारतीय राष्ट्रीय हॉकी टीम ऑस्ट्रियाविरुद्ध 6-0 ने जिंकून यशस्वी झाली. 26 मे रोजी नेदरलँड आणि भारत यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. भारताने त्यांना 3-0 ने पराजित केलं आणि सोबतच भारतीय टीमने आपल्या देशाचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. ध्यानचंद स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू होते. त्यांनी 5 सामन्यात 14 गोल केले होते.
 
ह्यानंतर एक वृत्तपत्राने असे लिहिले - 'हा हॉकिच्या सामना नाही जादू होते आणि ध्यानचंद "हॉकीचे जादूगार" आहेत.
 
1936 मध्ये मेजर ध्यानचंद यांच्या टीमने जर्मनीला पराजित केलं आणि परत स्वर्णपदक भारताच्या नावावर केलं. जर्मन नेते अॅडॉल्फ हिटलर ह्यांनी ध्यानचंद यांची प्रशंसा केली आणि ते यांच्या कौशल्याने इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व आणि जर्मन सैन्यात कर्नल पदाची ऑफर दिली पण ध्यानचंद यांनी ही ऑफर नाकारली.
 
34 वर्षांच्या सेवेनंतर ध्यानचंद 29 ऑगस्ट 1956 रोजी लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यातून निवृत्त झाले. नंतर त्यांनी राष्ट्रीय क्रीडा संस्था, पटियाला येथे मुख्य हॉकी प्रशिक्षक पद स्वीकारले. भारत सरकारने त्यांना 1956 मध्ये भारतातील तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले.
 
3 डिसेंबर 1979 रोजी ध्यानचंद यांचे यकृताच्या कर्करोगाने निधन झाले. 2012 मध्ये भारत रत्न म्हणून 20 वा राष्ट्रीय पुरस्कार, भारताचे केंद्रीय मंत्री द्वारा ध्यानचंद यांना प्रदान करण्यात आला. ध्यानचंद यांचे पुत्र अशोक ध्यानचंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दर वर्षी ह्यांच्या स्मरणात 29 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती