सर्व पितृमोक्ष अमावस्या : माहिती आणि विधी

शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (09:09 IST)
सर्व पितृ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित एक धार्मिक कृती आहे. सर्व पितृ म्हणजे सर्व पितरं आणि अमावस्या ज्याला आपण अवस देखील म्हणतो त्याचा अर्थ आहे ' नवा चन्द्र दिवस '  बंगाल च्या काही भागात हा दिवस 'महालय ' म्हणून साजरा केला जातो. जे दुर्गापूजेच्या सणाची सुरुवात करणे दर्शवतो. अश्या प्रकारे या महत्वाचा दिवसाला महालय अमावस्या किंवा सर्व पितृ मोक्ष अमावस्या देखील म्हटले जाते. 
 
हिंदू दिनदर्शिकेनुसार हे दक्षिण भारतात भाद्रपदाच्या महिन्यात साजरे करतात. 
 
हिंदू धर्मात या विधीचे खूप महत्व आहे. सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध पक्षाची शेवटची तिथी असते. भाविक विविध श्राद्धाचे पालन करतात. भाद्रपद महिन्यात, हा काळ सोळा दिवसाचा असतो जो पौर्णिमेला सुरु होऊन अवसेला संपतो. 
 
 
पद्धत आणि परंपरा - 
सर्व पितृमोक्ष अवसेच्या दिवशी मरण पावलेल्या त्या सर्व पितरांना तर्पण केले जाते ज्यांचा 'पौर्णिमेला', अवसेला, किंवा चतुर्दशी तिथीला मृत्यू झाला असेल. 
 
या विशिष्ट दिवशी, लोकं सकाळी लवकर उठतात आणि सकाळचे सर्व नित्यकर्म आटपवून पिवळे रंगाचे कापड घालतात आणि ब्राह्मणांना जेवण आणि देणगी देण्यासाठी आमंत्रित करतात. 
 
 
सामान्यतः: श्राद्ध समारंभ कुटुंबियातील ज्येष्ठ पुरुषानेच करावयाचा असतो. ब्राह्मणांचे हात-पाय धुवून त्यांना आदराने बसवणं गरजेचं असतं. 
 
सर्व पितृ अवसेला लोकं पूजा करतात आणि फुलं, दिवा आणि धूपबत्ती लावून आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना विनवणी करतात. त्यांना आनंदी करण्यासाठी त्यांना जवेचं पाणी दिले जाते. कुटुंबियातील मंडळी आपल्या उजव्या खांद्यावर एक पवित्र दोरा घालतात आणि देणगी देतात. 
 
पूजेची विधी पूर्ण झाल्यावर, ब्राह्मणांना जेवण देतात. ज्या स्थळी ब्राह्मणांना जेवणास बसवतात तिथे तीळ ठेवले जातात.
 
पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सतत मंत्रोच्चार केले जातात. 
कुटुंबी आपल्या पितरांची माफी मागतात आणि त्यांनी आयुष्यात दिलेल्या त्यांचा योगदानासाठी कृतज्ञता व्यक्त करतात. त्याच बरोबर ते त्यांना सद्गती आणि शांती मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती