Sharad Poornima 2019: जाणून घ्या काय करावे काय नाही

1. नेत्रज्योती वाढवण्यासाठी शरद पौर्णिमेला रात्री 15 ते 20 मिनिटापर्यंत चंद्राकडे त्राटक बघावे.
 
2. शरीरातील इंद्रिये शिथिल झाल्या असतील तर त्यांची पुष्टी करण्यासाठी चंद्र प्रकाशात ठेवलेल्या खिरीचे किंवा दुधाचे सेवन करावे.
 
3. चंद्र देव, लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवून वैद्यराज अश्विनी कुमारांची प्रार्थना करावी 'आमच्या इंद्रियांचे तेज वाढवा.' नंतर खिरीचे सेवन करावे.
 
4. शरद पौर्णिमेची रात्र दम्याच्या रुग्णांसाठी वरदानाची रात्र असते. रात्री झोपू नये. रात्र चंद्र प्रकाशात ठेवलेली खीर खाल्ल्याने दम्याच्या आजारांवर आराम मिळतो.
 
5. पौर्णिमा आणि अमावास्येवर चंद्राच्या विशेष प्रभावाने समुद्रात भरती येते. जेव्हा चंद्र इतक्या मोठ्या समुद्रात उलथापालथ कर कंपन करतो तर विचार करा आमच्या शरीरात असणारे जलीय अंश, सप्तधातू, सप्त रंग, यांच्यावरही चंद्राचा कितपत प्रभाव पडत असेल.
 
6. शरद पौर्णिमेला शारीरिक संबंधात लिप्त असणार्‍यांना अपंग मुले किंवा प्राणघातक आजाराला सामोरा जावं लागू शकतं.
 
7. शरद पौर्णिमेला पूजा, मंत्र, भक्ती, उपास, व्रत इतर केल्याने शरीर तंदुरुस्त, मन प्रसन्न आणि बुद्धी आलोकित होते.
 
8. या रात्री सुईत दोरा घालण्याच्या अभ्यासामुळे नेत्रज्योती वाढते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती