मनसेकडून अनोख्या स्पर्धा, राज्यातला सर्वाधिक चांगला आणि सर्वाधिक वाईट रस्ता शोधणार

मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (09:48 IST)
मनसेकडून एक अनोखी स्पर्धा घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये राज्यातील सर्वाधिक चांगला रस्ता आणि सर्वात वाईट रस्ता निवडला जाणार आहे. याबाबत लोकांकडून फोटो मागवले जात आहे. यानंतर लोकांना रोख रक्कमेचे बक्षीस देखील देण्यात येणार आहे.
 
जो रस्ता चांगला निवडला जाणार तिथल्या अधिकाऱ्यांचा सत्कार मनसेकडून करण्यात येणार आहे.मात्र जो रस्ता खराब निवडला जाणार आहे. त्या ठिकाणी मात्र मनसे स्टाईलने या खराब रस्त्यावरील दगड,माती घेऊन त्या रस्त्याला जबाबदार असणाऱ्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची महाआरती केली जाणार आहे. 
 
मनसेच्या रस्ते आस्थापना विंगकडून ही मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंत अनेकांनी खराब रस्त्यांमुळे अपघातात आपले जीव गमवले आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी लोकांच्या सहभागातून अशा अनोख्या पद्धतीने महाराष्ट्रातील रस्ते सुधारण्यासाठी हा उपक्रम मनसेकडून राबवण्यात येत असल्याचं आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती