साताऱ्याचं नाव दिसलंच नाही; उदयनराजे वेटींगवरच

गुरूवार, 28 मार्च 2024 (08:48 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली आहे. २८ मार्च रोजी आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करू, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, उदयनराजेंचं नाव आजच्या यादीत जरी नसलं तरी उद्याच्या यादीत येऊ शकतं. मात्र, सर्वकाही पत्ते उद्याच उलगडले जाणार आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे, साहजिकच येथील लोकसभा उमेदवार घड्याळाच्याच चिन्हावर निवडणुकीसाठी द्यावा, अशी कार्यकर्त्यांनी भावना असल्याचं संजीव नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सातारा जागा कोणाला मिळणार, हे उद्याच जाहीर होईल, असेच चित्र आहे.
 
साताऱ्यात आल्यावर उदयनराजे म्हणाले
"लोकांचं अलोट प्रेम पाहून मन भारावून गेलं. मी आयुष्यात राजकारण कधी केलं नाही. लोकांना केंद्रबिंदू मानून मी समाजकारण केलं. त्याचीच पोचपावती म्हणून आज लोक एवढ्या संख्येने उपस्थित आहेत. हे सगळं बघून काय बोलावं, हे मला सुधरत नाही. कालही मी जनतेसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.  उमेदवार यादी आज जाहीर होईल. तो एक प्रक्रियेचा भाग आहे. पण सगळं निश्चित झालं आहे. मी निवडणूक लढणारच आहे," असा दावा त्यांनी केला आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती