दुष्काळाचा सामना करण्यासाठी 'हायटेक' वॉर रुम सज्ज

मंगळवार, 7 मे 2019 (16:52 IST)
दुष्काळाचा सामना करण्यासाठी मंत्रालयामध्ये मदत आणि पुर्नवसन विभागाने 'वॉर रुम'ची स्थापना केली आहे. यामध्ये चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी यावेळी 'कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम' (cattle camp management system) हे मोबाईल ऍपलिकेशनही विकसित करण्यात आलंय. तसंच चारा छावण्यातील पशुधनाच्या कानावर टॅग लावण्यात आला आहे, ज्यामध्ये बारकोडही आहे. यामुळे चारा छावण्यांच्या चालकाला छावणीमध्ये नेमकी किती जनावरे आहेत? याची माहिती ठेवता येणार आहे. 
 
याआधी चारा छावण्यांबाबत मंडल, तालुका, जिल्हास्तरावर मग विभागीय आयुक्त स्तरावर माहितीची संकलन करत ताजी माहिती दिली जात होती. मात्र आता www.charachavni.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं असून जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना थेट माहिती भरता येणार आहे. 
 
गावांत तसंच वाड्यांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवर जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात किती टॅकर, नेमके कुठे सुरु आहेत, रोजच्या फेऱ्या किती? याची माहिती मंत्रालयातील 'वॉर रुम'ला थेट मिळणार आहे.
 
हे मोबाईल ऍपलिकेशनही विकसित करण्यात आलंय. तसंच चारा छावण्यातील पशुधनाच्या कानावर टॅग लावण्यात आला आहे, ज्यामध्ये बारकोडही आहे. यामुळे चारा छावण्यांच्या चालकाला छावणीमध्ये नेमकी किती जनावरे आहेत? याची माहिती ठेवता येणार आहे. ही माहिती दिवसातून एकदा संगणकीय प्रणालीद्वारे अपलोड करणं छावणी मालकाला बंधनकारक करण्यात आलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती