मग 'आरे' त गवत लावून जंगल घोषित करणार का? राज यांचा सवाल

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. एका रात्रीत 2700 झाडं तोडली तेव्हा शांत होते. मग आता गवत लावून जंगल घोषित करणार का? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  केला. मागाठाणे आणि दिंडोशी मतदारसंघातील प्रचारसभेत ते बोलत होते.
 
भाजप-शिवसेना “हीच ती वेळ” म्हणत आहेत, मग मागील 5 वर्ष हे काय करत होते? मागील 5 वर्ष हे फक्त हा घ्या आमचा राजीनामा म्हणत होते. यातच त्यांचे 5 वर्ष निघून गेले, असाही टोला राज ठाकरेंनी लगावला. बँका बुडत असताना सरकार आणि रिझर्व्ह बँक जबाबदारी घेत नाही. मग सर्वसामान्यांच्या पैशांची जबाबदारी कोणाची? पीएमसी बँकेच्या संचालकपदावर भाजपचे लोक आहेत. त्यांनी बँकेवर निर्बंध येण्याआधी एक दिवस नातेवाईकांना पैसे काढण्यास सांगितलं. सर्वसामान्यांचं काय?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती