घरातील भांडणाला वैतागला भर रस्त्यावरील उड्डाणपूलावर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

एक 20 ते 22 वर्ष वयाचा तरुण पवळे उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. स्थानिक नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी हा प्रकार बघितला. निगडी वाहतूक विभागाच्या महिला पोलीस हवालदार शिंदे यांनी तात्काळ तरुणाकडे धाव घेत त्याला रोखले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरगुती कारणावरून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. पोलिसांना बोलावून तरुणाला निगडी पोलिसांच्या ताब्यात दिले. वाहतूक पोलीस आणि नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.निगडी येथील पवळे उड्डाणपुलावर पहाटे साडेपाचच्या सुमारास एक मालवाहतूक करणारा ट्रक उलटला. तर लगेच दोन तासात एका तरुणाने याच उड्डाणपुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आई – वडीलांना कोण सांभाळणार यावरुन भावा भावांमध्ये भांडण झाली. या भांडणानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. पवन भंडारी असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याचा भाऊ विप्रो कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतो. आई वडील खेड येथे राहात असून वडील हे अपंग आहेत. त्यांना कोण सांभाळणार यावरून दोघात जोरदार भांडण झाले याच रागातून तरुणाने थेट पुणे-मुबंई जुना महामार्गावरील मधुकर पवळे उड्डाण पुलावर जात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती