छत्रपतींचे भव्य स्मारक समुद्रातच होणार मुंबई उच्च न्यायालय

शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (16:59 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य शिवस्मारक अरबी समुद्रात उभारणार या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिलाय. यामुळे आता अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या प्रकल्पाविरोधात दाखल करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी न्यायालयाने केली आहे.  प्रकल्पच अतार्किक, चुकीच्या जागेवर उभारण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या याचिकेवर अंतिम सुनावणी होईपर्यंत या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी कोर्टात केली होती.  न्यायालयाने याचिकाकर्ते आणि सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर याप्रकरणी आज निर्णय सुनावला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवस्मारक काम बंद होईल किंवा त्यावर पुन्हा कोणी आक्षेप घेईल याची चिन्हे कमी झाली असून महाराजांचे भव्य स्पारक होणारच हे स्पष्ट झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती