वाचा, शाळा चालू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी काय माहिती दिली

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (16:55 IST)
राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच २३ नोव्हेंबर २०२० पासून राज्यातील शाळा चालू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर शाळा सुरु करण्यात येतील, अशी माहिती शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
 
शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन-अध्यापन प्रक्रिया व परीक्षा पार पाडण्यासाठी सरकार सक्षमपणे विचार करेल असे शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती