दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, क्लिप सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी

शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (16:16 IST)
धार्मिक क्षेत्र असलेले पंढरपूर आज हादरून गेले आहे. पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पाच नराधमांनी 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे. बलात्काराच्या या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर हादरलं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर 5 नराधमांनी बलात्कार केला. या प्रकरणात आता पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
 
या प्रकरणातील  5 आरोपींपैकी पीडित तरुणी एकाची मैत्रिण होती. त्याने तिला एका अज्ञात स्थळी सुलभ शौचालयाजवळ बोलावलं. त्यानंतर पाचही आरोपींकडून तिच्यावर बलात्कारासाठी दबाव टाकण्यात आला. यातील एका आरोपीने तिला छेडलं तर दुसऱ्याने तिला दारू पाजली. त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. यात 5 व्या मुलाने सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करू अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली.बलात्काराचा व्हिडिओ शेअर होईल या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगतली नाही. याचाच फायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. तिच्याकडे पैशांची मागणीदेखील करण्यात आली. काही दिवसांनी पीडित तरुणीच्या घरी तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला आणि त्यानंतर तिच्या आईने विचारलं असता या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. पीडित तरुणीच्या घरच्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती