नागपूरकरांना मेट्रोसोबत ई-सायकल सुविधा

शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (09:08 IST)
नागपूरमध्ये मेट्रोच्या कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी ई-सायकल सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बाऊन्स शेयर या नावाने सायकल सेवा प्रत्येक मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाहेर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सायकल सेवा वापरण्यासाठी मोबाईलवर बाउंस शेअर हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. सायकल बुक करायची, अॅपवरुन क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि सायकल घेऊन जायची. काम झाल्यावर जवळच्या सायकल हबमध्ये सायकल परत करायची. जेवढा वेळ सायकल वापरली जाईल, तेवढे पैसे अॅपच्या माध्यमातून कापले जातील. ही सायकल वापरण्यासाठी दहा मिनिटांसाठी १ रुपया एवढा दर आकारला जाणार आहे.
 
दिवसभरासाठी वीस रुपये तर सायकलचा महिन्याचा पास तीनशे रुपयांत मिळणार आहे. या सायकल सेवेमध्ये साधी सायकल आणि बॅटरीवर चालणारी ई सायकल असे दोन्ही पर्याय उपलब्ध राहणार आहे. ई सायकलच्या शुभारंभाबरोबरच आणखी एक महत्त्वाची घोषणा मेट्रोनं केली आहे. मेट्रोमध्ये नारीशक्ती नावाचा एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती