राज ठाकरेंची सरकारला विनंती

मंगळवार, 16 एप्रिल 2024 (14:55 IST)
महाराष्ट्र- गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊसामुळे उष्णता भडकली असून महाराष्ट्रात उन्हाचा जोर वाढला आहे. तसेच उष्णतेच्या लाटेमुळे अनेक लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतांना दिसत आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विनंती केली आहे की शाळेला लवकर सुट्ट्या देण्यात याव्या. कारण महाराष्ट्र राज्यात काही दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उष्णतेच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
 
जागतिक वातावरणातल्या बदलत्या हवामानामुळे यावर्षीचा उन्हाळा अतिउष्ण असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे राज्यामधील नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. तसेच उष्णतेमुळे शारीरिक समस्या देखील निर्मण होतांना दिसत आहे. यामुळे राज ठाकरे यांनी सरकारला विनंती केली की, शाळांना लवकर सुट्टी द्या. तसेच पशु-पक्षांची काळजी घ्या असे आवाहन देखील त्यांनी मनसेसैनिकांना केले आहे. 
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत की, काही दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यामध्ये तसेच कोकण या भागांमध्ये तापमानाने 40 अंशापर्यंत स्तर गाठला आहे.  इतर जिल्ह्यांमध्ये देखील तापमान वाढत आहे. तसेच उष्णतेची लाट आली आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे. आजून शाळांना सुट्टी लागायला वेळ असून मुले तसेच उन्हामध्ये शाळेत जातांना दिसत आहे. म्हणून शाळांना लवकर सुट्टी लागावी अशी विनंती राज ठाकरे यांनी सरकारला केली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती