मुंबईला पावसाने जोरदार झोडपले, अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतुकीवर मोठा परिणाम

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या  मुंबईत येथे  3 आठवड्यापासून थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील  हिंदमाता परिसरात रात्री,  किंग सर्कल भागात सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून येतो आहे. सकाळी ऑफिसच्या वेळेत रस्त्यांवर पाणी साचल्याने चाकरमान्यांचे फार  हाल झाले. सोबतच दक्षिण मुंबईला देखील  पावासाने झोडपलं असून  उपनगरातही जोरदार  पाऊस झाला आहे.
 
अंधेरी, वांद्रे, दादरमध्येही पावसाचा जोर
 
अंधेरी, वांद्रे, दादर या ठिकाणी जोरदार पावसामुले  अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी  साचले होते. त्यामुळे  पायी जाणाऱ्यांसह,  दुचाकी,  चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत होते. तर  सायन ते सीएसएमटी दरम्यान ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल  त्यामुळे काही प्रमाणात रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम  झाला आणि नेहमी प्झारमाणे मध्य रेल्वेवर लोकल उशिराने धावल्या आहेत. 
 
वसई-विरार-नालासोपाऱ्यात पाणीच पाणी 
 
वसई-विरार-नालासोपारा परिसरातही पाऊस सुरु असू,  मंगळवारी सायंकाळी  पावसाने जोरदार आगमन केलं. रात्रभर पावसाने वसई-विरारला झोडपलं. वसई-विरार-नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही मंगळवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. तर बुधवारी पुन्हा  सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. संततधार पावसामुळे कल्याणमधील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणच्या अहिल्याबाई चौक, मोहम्मद अली चौक, शिवाजी चौक, कल्याण पूर्वेतील राजाराम पाटील नगर अशा अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ठाण्यात जोरदार पावसामुळे  जागोजागी पाणी साचले असून,  रेल्वे सेवेवरही या मुसळधार पावसाचा परिणाम झाल आहे.  मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती