पार्थ अजित पवार म्हणतात सुशांतच्या आत्महत्येबाबत सीबीआय चौकशी करा

मंगळवार, 28 जुलै 2020 (09:55 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४० दिवसांचा काळ उलटला आहे. तरी देखील त्यांच्या आत्महत्ये मागील ठोस कारण समोर आलेले नाहीय. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३७ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहे. एवढचं नाही तर सुशांतची आत्महत्यानसून हत्या आहे, असं वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशी सोपवण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केलेली आहे.
 
गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केलेली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य चौकशी व्हावी अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी. ‘ असं ट्विट पार्थ पवार यांनी केलेलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती