खा.श्रीकांत शिंदेंनी नाशिकमधील उमेदवार जाहीर केल्यानंतर प्रवीण दरेकर स्पष्टच बोलले

गुरूवार, 14 मार्च 2024 (09:29 IST)
उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं, तेव्हा ते घरात बसले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मातोश्री मधून बाहेर पडले नाहीत. जेव्हा शिवसैनिकांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा साधला नाही.
 
अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या सोबत गेली, तेव्हा त्यांना जाग येते. परंतु आता जाग येऊन त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही” अशा शब्दात भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ-वाशिम दौऱ्यावर खोचक टीका केली.
 
मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल प्रवीण दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे ऑथोरिटी नाहीत, एकवेळ एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं असत, तर आपल्याशी बोललो असतो.
 
तिन्ही पक्षाच्या सुसंवादातून एकत्र निवडणूक होईल. कुठेही विसंवाद होणार नाही. ज्या जागा त्यांना वाटतात, त्या जागा ते मागतायत. ज्या जागा योग्य असतील त्या त्यांना मिळतील”
Edited By - Ratnadeep Ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती