नवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार

बुधवार, 16 जानेवारी 2019 (09:28 IST)
येत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते ग्लोबल एव्हिएशन समिटमध्ये बोलत होते. नवी मुंबईतील विमानतळ आकारास येत असतानाच या विमानतळाच्या आजूबाजूस आणखी 9 विमानतळ सेवेत येऊ घातले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
 
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर देशाच्या सकल उत्पादनाच्या 1 टक्के एवढी भर पडेल. पुणे विमानतळाचा विकास प्रमुख माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महानगर लक्षात घेऊन केला जात आहे. तर नागपूर विमानतळावरून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानउड्डाणे होतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती