फोन चार्जीग तरुणाच्या जीवावर, शॉक लागून मृत्यू

गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (14:07 IST)

मोबाईल बाबत रोज नवीन गोष्टी घडत आहे. जितका फायदेशीर इतकाच जीवघेणा मोबाईल ठरत आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. यामध्ये मोबाइल चार्जिंगला लावून बोलताना फोनचा स्फोट झाला आणि त्यांमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे.चार्जिंग सुरु असताना फोन उचलल्याने 28 वर्षीय तरुणाचा विजेच्या शॉक लागून मृत झाला आहे. तपन बंगाली असे तरुंणाचे नाव आहे. तो पश्चिम बंगालचा रहिवासी होता. तो वांद्र्यातील शास्त्रीनगर लेन नं 1 मध्ये राहायचा. तो फुलांचे डिझाईन बनवण्याचे काम करत असे, त्याने मित्राचा फोन आला म्हणून चार्जिंग सुरु असतांना फोन उचलाल आणि फोनचा स्पोट होत, जोरदार विजेचा धक्का तपना लागला होता. त्याच्या रूम मधील इतरांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तपन मृत झाला होता. त्यामुळे आता सेल्फी काढताना होणारे अपघात, चार्जीग सुरु असतांना होणारे अपघात त्यामुळे मोबाईल आता फार सांभाळून वापरणे गरजेचे आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती