राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय : जितेंद्र आव्हाड

सोमवार, 23 मार्च 2020 (16:52 IST)
सरकारच्या आवाहनानंतरही निर्णयानंतरही राज्यभरात अनेक ठिकाणी नागरिक काम नसताना देखील घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 89 वर पोहचली आहे. मात्र तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीत. मी स्वत: फिरुन हा अनुभव घेत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच लोक ऐकत नसल्यामुळे राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत आता नाही, तर कधीच नाही अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती