कोविड -19 आजपासून मुंबईत कोणतीही वृत्तपत्रे उपलब्ध होणार नाहीत

सोमवार, 23 मार्च 2020 (15:40 IST)
मुंबईतील सर्व प्रिंट मीडिया हाऊसेसनी आजपासून त्यांचे मुद्रण आवृत्तीचे प्रकाशन व वितरण स्थगित केले आहे. टाईम्स ऑफ इंडिया समूहाने त्याच्या मुंबई आवृत्तीचे प्रकाशन बंद केले आहे.

हिंदुस्तान टाईम्सचे कार्यकारी संपादक सचिन काळबाग यांनी ट्विट केले आहे की, मुंबईतील हिंदुस्तान टाईम्सची कोणतीही आवृत्ती आता निर्बंधामुळे येणार नाही. मात्र, ई-पेपर उपलब्ध राहणार आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
"कोविड -19चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने मुंबईत हिंदुस्तान टाइम्सची कोणतीही आवृत्ती उपलब्ध नाही, त्यामुळे वितरण करणार्यांना वाटप करणे कठीण झाले आहे. तथापी ई-पेपर आवृत्ती उपलब्ध आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती