कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा

सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (09:54 IST)
दरवर्षी दसरा चौकात आयोजित होणारा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आला. हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात ऐतिहासिक जुना राजवाडा येथे संपन्न झाला. 
 
शमीपूजन व आरती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यानंतर सोने लुटण्याचा सोहळा व पारंपरिक पालखी सोहळा प्रतिमा प्रतिकात्मक पद्धतीने पार पडला. 
 
कोल्‍हापूरचा शाही दसरा सोहळा आणि म्‍हैसूरचा शाही दसरा सोहळा देशात प्रसिध्द आहे. कोल्‍हापुरातील दसरा चौकात पारंपरिक पध्दतीने हा सोहळा दरवर्षी पार पडत असतो. यामध्ये लोकांचा सहभागही मोठा असतो. या सोहळ्याला आता लोकोत्‍सवाचे स्‍वरूप प्राप्त झाले आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरित्‍या होणारा हा सोहळा रद्द करण्यात आला. मात्र रितीरिवाजानुसार कोल्‍हापुरातील जुना राजवाड्यामध्ये पारंपरिक पध्दतीने दसऱ्याचा सोहळा संपन्न झाला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती