पुणेकर महत्वाची सुचना या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (16:20 IST)
अवकाळी पावसाने पुण्याला जोरदार झोडले आहे. त्यामुळे पुण्यात अनेकदा तुंबून पाणीच पाणी झाले होते. हे सर्व एका बाजूला असताना, आता पुणेकरांना पाणीकपातीला समोरे जावे लागणार आहे. 
 
शहरातील पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (7 नोव्हेंबर) विद्युत आणि पंपिंग तसेच स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (8 नोव्हेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती दिली आहे. सोबतच पाणी योग्य पद्धतीने वापरा असे देखील सुचवले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती