लवकरात लवकर सरकार स्थापन होणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले आहे. ”सरकार स्थापनेचा पेच लवकरच सुटेल असं मला वाटतं, शेवटी सर्वांना महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं आहे. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे.

या संकटाच्या काळात नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. कारण, काळीजावाहू सरकारला निर्णय घेण्यासाठी काही बंधनं असतात, सध्या जे निर्णय घेता येतात ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल अशी मला अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर बोलत होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती