पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील आज मतमोजणी

गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (10:00 IST)
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या ५१ टक्के मते मिळाली तरच उमेदवार पहिल्या फेरीत निकाल लागेल. अन्यथा बाद फेरीत मतमोजणी केली जाईल व त्यात कमी मते मिळणारे उमेदवारी क्रमाने बाद होतील. या किचकट प्रक्रियेमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील आज होणाऱ्या मतमोजणीत निकाल लागण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत.
 
पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवार रिंगणात असल्याने या मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण न केल्यास निश्चित मतांचा कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागेल. यात सर्वात कमी मते मिळणारे उमेदवार उतरत्या क्रमाने एकापाठोपाठ बाद होतील. ही सारीच किचकट प्रक्रिया आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती