संतापजनक दहावीच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, पंकजा मुंढे यांच्या जिल्ह्यातील घटना

सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (10:25 IST)
बीड जिल्हायात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. शिकवणीहून घरी जात असताना बीडमध्ये 4 नराधमांनी दहावीच्या विद्यार्थीनीचं अपहरण केलं. तिला नेकनूर येथे नेवून वासनांध आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनं बीड जिल्हा हादरला असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे प्रकरण पोलिसांनी दाबण्याचे प्रयत्न केले असून, या नराधमांना अजूनही अटक झालेली नाही. त्यामुळे महिला विषयी खाती संभाळणाऱ्या आणि सरकारमधील मोठ्या नेत्या बीड येथील पंकजा मुंढे या प्रकरणी लक्ष कधी देणार हे नागरिक विचारात आहेत.  मागील वर्षभरापासून आरोपी पीडित मुलीची छेड काढत होता. 2 दिवसांपूर्वी ती खासगी शिकवणी वर्गावरून घरी जात असताना आरोपीने त्याच्या मित्रांच्या मदतीने तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिला नेकनूर परिसरात एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार केले आहे.
 
विशेष म्हणजे अल्पवयीन पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर आरोपीचे वडील घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी स्वतःच्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी पीडित मुलीलाच बीड शहरातील एका शेडमध्ये डांबून ठेवल होते व त्यांनी सुद्धा अत्याचार केला आहे, जेव्हा प्रकरण अंगलट आलं, तेव्हा आरोपीच्या वडिलांनी मुलीला परत पोलीस ठाण्यात हजर केले. मात्र पोलीसानी हे गंभीर प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे प्रकरणात लक्ष घालणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती