मोदी यांचा महाराष्ट्र दौरा, दोन मोठ्या घोषणा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी औरंगाबादमध्ये येणार आहेत. औरंगाबाद येथील दोन प्रमुख कार्यक्रमांना ते उपस्थिती राहतील. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या भव्य हॉलचे उदघाटन आणि राज्यातील बचत गटांच्या महिलांना नरेंद्र मोदी संबोधित करतील. मोदी महाराष्ट्रासाठी दोन खास गोष्टी देतील, औरीक सिटीचं  मुख्यालयाचं उद्घाटन आणि दुसरं महिलांसाठी खास घोषणा करणार आहेत. 
 
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता अवघ्या काही दिवसांवर आहे, त्यामुळे देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई, औरंगाबाद असा त्यांचा दौरा आहे.  सर्वात महत्वाचे दोन कार्यक्रम औरंगाबाद शहरात होत असून, शनिवारी दुपारी एक वाजता नरेंद्र मोदी हे देशातील पहिल्या औरीक सिटीतील ग्लोबल इमारतीचं उद्घाटन करतील. 
 
औरीक सिटी हा केंद्र सरकारचा एक महत्वकांक्षी उपक्रम आहे. यात पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभारली जात आहे. औरीक सिटी या संपूर्ण उद्योगाचे आणि निवासी वसाहतीचे नियमन करणारी संस्था असणार आहे. ज्याच्या प्रमुख इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती