माजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन

शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (16:26 IST)
ज्येष्ठ समाजवादी नेत्या, माजी खासदार कॉ. रोझा देशपांडे (९२) यांचे आज दादर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहीत कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

फुफ्फसाचा संसर्ग झाल्याने त्यांना मंगळवार दुपारीच दादर येथील शुश्रूषा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.भारतीय कम्युनिस्ट पक्षात त्या सहभागी होत्या. १९६७ मध्ये मुंबई उत्तर मतदारसंघातून त्या खासदारही झाल्या होत्या. ज्येष्ठ समाजवादी नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या राजकारणाचा वारसा त्यांनी पुढे चालवला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती