जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने लट्ठपणा वाढतो

शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (14:43 IST)
आजच्या काळात लोकं पॅक्ड फूडवर अवलंबून आहेत. फास्ट फूड आणि जंक फूड ही तरुणांची पहिली पसंती आहे, परंतु यामध्ये जास्त प्रमाणात मीठ असल्यामुळे हे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवतात. मिठात सोडियम मुबलक प्रमाणात आढळतं. सोडियम हे मिठाचे मुख्य घटक आहे. म्हणून याचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. सोडियमच्या अधिक सेवनाने काय काय त्रास उद्भवतात चला जाणून घेऊया.
 
जंक फूडचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने मिठासोबत ‍अधिक प्रमाणात कॅलरीज वाढ होते. परंतु शारीरिक श्रम कमी असल्यामुळे कॅलरीज बर्न होत नसून लठ्ठपणाची समस्या वाढते.
 
आजच्या काळात तरुण आणि मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक आजार उद्भवतात. सोडियमचे जास्त सेवनाने उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.
 
जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने मूत्रपिंडाशी निगडित त्रास होतात. हृदय आणि पेशींच्या कामकाजासाठी सोडियम घेणं आवश्यक आहे. परंतु याचे जास्त प्रमाण घेणं शरीराला हानी पोहोचवतात. यामुळे शरीराच्या ऊतकांमध्ये जळजळ होते. म्हणून, एका दिवसात मर्यादित प्रमाणातच मीठ खावं. 
 
एका दिवसात शरीराला किती सोडियम आवश्यक आहे ?
 
सोडियमचे जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरात त्रास वाढतात ज्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते. एका दिवसात एका व्यक्तीला 2300 mg पेक्षा कमी प्रमाणात सोडियम घ्यावं. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी सोडियम कमी प्रमाणात घ्यावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती