नो जीम नो फिटनेस क्लास,हा व्यायाम करा आणि फिट रहा

गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (10:53 IST)
अनेकांची व्यायामाची संकल्पना फक्त जीमपुरती किंवा ट्रेडमीलवर चालण्यापुरती मर्यादित असते. पण तंदुरुस्त राहाण्यासाठी जीम किंवा फिटनेस क्लासला जाण्याची आवश्यकता असतेच असे नाही. तुमच्याकडे दोरीच्या उड्या आणि व्यायामाची इच्छा या दोन्ही गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच व्यायाम करता फिट राहू शकता. दररोज दोरीच्या उड्या मारण्याचे बरेच लाभ आहेत.
 
* दोरीच्या उड्यांमुळे डोळे, हात आणि पाय यांच्यातलं सहकार्य वाढतं. पाय आणि दोरीच्या हालचालीकडे तुमचं लक्ष नसलं तरी मेंदू या सगळ्या हालचालींची नोंद ठेवत असतो. दोरीच्या उड्या मारताना विविध प्रकारच्या हालचाली केल्यामुळे अवयवाचं सहकार्य अजूनच वाढतं.
* उड्या मारताना होणार्यान हालचालींमुळे मेंदूलाही नवं खाद्य मिळतं. यामुळे तुमच्या मज्जासंस्थेचा मेंदू, पाय आणि हातांशी संवाद वाढतो. भविष्यात याचे बरेच लाभ होतात.
* दररोज ठरावीक वेळ दोरीच्या उड्या मारल्यामुळे तुमच्या कॅलरी खर्च होतात. जास्तीत जास्त कॅलरी खर्च करण्यासाठी उड्यांचा वेग वाढवता येईल.
* या व्यायामामुळे पायाचा खालचा भाग तसंच पोटरीच्या स्नायूंना बळकटी मिळते. यामुळे पायांना दुखापत होण्याचा धोका अनेक पटींनी कमी होतो. यामुळे शरीराचं संतुलन साधणंही शक्य होतं.
* हाडांची घनता आणि क्षमता वाढवण्यासाठी दोरीच्या उड्या मारा. या व्यायामामुळे स्नायूंमध्येही लवचिकता येते.
 चिन्मय प्रभू

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती