मुंबईकरांना हवामान खात्याचा इशारा, सुट्टी आहे म्हणून समुद्रकिनारी जाऊ नका

शनिवार, 6 जुलै 2019 (16:20 IST)
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर अजूनही पावसाने उघडीप दिली नाहीये, मुसळधार पावसानंतर आता आकाश पुन्हा निरभ्र झाले असले तरी मागील आठवड्यातच आलेल्या सलग पावसामुळे मुंबई तुंबली होती. त्यामुळे बईकरांच्या विकेंडही पावसात जाणार असल्याचे सकाळी झालेल्या पावसामुळे वाटु लागले आहे. आज दुपारी मुंबईच्या समुद्रात लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून सावधतेचा इशारा दिला आहे. आज सकाळी मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस झाला असून, सोबतच दक्षिण मुंबईत हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर उपनगराच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचेही म्हटले आहे. 
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अरबी समुद्रात आज दुपारी हायटाईडचा इशारा दिला आहे. अशावेळी पाऊस असल्यास मुंबईच्या अनेक भागात पाणी साचू शकते. भरतीच्यावेळी समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळ कोणताही धोका न पत्करता समुद्रकिनारी न जाणेच योग्य राहील असे स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती