दारू पिणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची दबंगगिरी, नागरिकांनी चोपले

बुधवार, 29 मे 2019 (09:57 IST)
राज्यात सध्या पोलिस नागरिकांना कायदा पाळायला लावत असून त्यातही ड्रंक ड्राईव्ह करावाई सुरु केली आहे. मात्र दारू पिऊन कार चालवणा-या एका पोलीस अधिका-याला गावकऱ्यांनी बेदम चोप दिला आहे. हा घटना लातूर जिल्ह्यातील घडली असून, पोलीस अधिका-याने दारुच्या नशेत कार चालवत पाच जणांना जखमी केले, त्यामुळे संतापलेल्या गावक-यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गित्ते या पोलीस अधिका-याला चांगलाच चोप दिला आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे ही घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष गित्ते हा वादग्रस्त असून वरिष्ठांकडून त्याला नेहमीच पाठिशी घातले जात असल्याचा आरोप गावक-यांनी केलाय. संतोष गित्ते हे चाकूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडतात, मात्र, वरिष्ठांच्या कृपाअशीर्वादाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. मात्र ते भर दिवसा गीत्ते याने आपल्या कारमध्ये दारू पित नलेगाव येथील आऊट पोस्टकडे निघाले होते, दारूच्या नशेत त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या तीन दुचाकींना उडवले, या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले.अपघातानंतर गीत्ते यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडून जोरदार चोप दिला. या घटनेनंतर गीत्तेला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. अशीच कारवाई यापूर्वी केली असती तर पाच जण जखमी झाले नसते अशी प्रतिक्रीया गावकऱ्यांनी दिली आहे. संतोष गीत्ते याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती