जळगाव जिल्ह्यात कोरोना समूह संसर्गाला सुरुवात

रविवार, 31 मे 2020 (11:13 IST)
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जळगावात 635 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या दोन महिन्यात 73 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशात कोरोना बळींचा मृत्यूदर 2.87 टक्के आहे. तर जळगावात कोरोना बळींचा मृत्यूदर हा सर्वाधिक 11.49 टक्के आहे. 
 
देशाच्या तुलनेत जळगावचा मृत्यूदर हा चौपट आहे. जळगावातील भुसावळमध्ये सर्वाधिक 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्या खालोखाल अमळनेर 13 आणि जळगाव 11 जणांचे मृत्यू झाला आहे. रावेरमध्येही 11 कोरोनाबाधितांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 11.49 टक्के असला तरी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्याने तपासणीची संख्या वाढेल. त्यामुळे रुग्णांचे निदान वाढेल आणि मृत्यूदरही आपोआपच कमी होईल. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यापूर्वी जिल्ह्यातील तपासणीचा आकडा कमी आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती