सफाई कर्मचा-यांचे नऊ महिन्यापूर्वी कोरोनाने निधन, वारसाला मिळाले ५० लाख

मंगळवार, 15 जून 2021 (08:05 IST)
नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत पंचवटी विभागात दररोज साफसफाई व स्वच्छतेचे काम करीत असतांना कै.सुरेश काशिनाथ आव्हाड, सफाई कर्मचारी यांचे कोरोना विषाणूच्या आजाराने उपचाराच्या दरम्यान १५ आॅक्टोंबर २०२० रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे आव्हाड यांच्या पत्नी मंदा सुरेश आव्हाड (पत्नी) यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत ५० लाखाचा विमा संरक्षण निधी थेट बँक खात्यावर जमा करण्यात आला. मयत सफाई कर्मचारी यांच्या वारस पत्नी यांनी शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण कागदपत्राची पुर्तता करून दिल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांच्या अधिपत्याखाली तसेच शासनाचे अधिकारी व मार्गदर्शनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ.कल्पना कुटे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत निधीचा लाभ उपलब्ध करून दिला.
 
सद्यस्थितीत कोविड-19 आजाराच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात १३ मार्च २०२० च्या अधिसुचनेनूसार, अधिसुचनेच्या दिनांकापासून साथरोग अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे, त्या अर्थी साथरोग अधिनियम, १८९७ च्या खंड – २, ३ व ४ नूसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानूसार महाराष्ट्र शासन राज्यात कोरोना विषाणु मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियत्रंण करणेकामी स्वच्छता ठेवणे व याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे करिता नाशिक महानरगपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील, सहाही विभागातील सफाई कर्मचारी हे दररोज भागात जाऊन सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, व्यावसायिक ठिकाणे, भाजीबाजार, मनपा कार्यालय, मनपा रुग्णालय, कोविड रुग्णालय, आर.टी.पी.सी.आर व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प, इ. ची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता केली असल्याचेही मनपाच्या अधिका-यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती