मी पुन्हा येणार आहे, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे विधिमंडळातील शेवटचे जबरदस्त भाषण

बुधवार, 3 जुलै 2019 (09:57 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोप भाषण करताना मी महाराष्ट्राने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे असे म्केहटले आहे. मी कुठल्याही प्रयत्नाकडे सकारात्मकतेनं पाहिलं असून, अनकेदा अडचणींना तोंड देऊन मी 15 ते 20 वर्षांपासूनची रखडलेली अनेक प्रश्न  सोडवू शकलो आहे. मागील  5 वर्षातील कामांचा लेखाजोखा थोडक्यात यावेळी मांडला आहे. जनतेचं आभार मानत पुन्हा तोच विश्वास घेत मी पुन्हा येईन, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी  अटलींच्या या कवितेनं मला नेहमीच प्रेरणा दिली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  
 
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन याच निर्धारानं 
याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मित्तीसाठी
मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मित्तीसाठी
मी पुन्हा येईन, माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनिवण्यासाठी
माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मित्तीसाठी
मी पुन्हा येईन, याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी
प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत, माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रुप देण्यासाठी नव महाराष्ट्रनिर्मित्तीसाठी... 
मी पुन्हा येईन
 
असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाषण करताना, गेल्या 5 वर्षातील कामांचा आढाव घेत, सर्वांचे आभार मानले. तसेच, विधानसभा अध्यक्षांचे आभार आणि अभिनंदनही केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती