महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात

बुधवार, 3 जुलै 2019 (09:50 IST)
महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे जवळपा स्पष्ट झाले आहे. नगर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित आहे. लवकरच पक्षाकडून  घोषणा होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात AICC सदस्य असून, थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही लोकसभा पराभवानंतर राजीनामा पक्सोषाला दिला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, त्यांच्या जागी आता बाळासाहेब थोरात यांची वर्णी जवळपास निश्चित आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर, विधानसभेतील महत्त्वाच्या पदांबाबत महाराष्ट्र काँग्रेसने फेररचना केली असून, विधीमंडळ नेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे, तर विधानसभा नेतेपदी विदर्भातील काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवर यांची वर्णी लागली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती