जेजूरी खंडाेबा मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शन वेळेत बदल

गुरूवार, 1 एप्रिल 2021 (15:50 IST)
राज्यात कोरोनाबाधितांच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरांत अंशत: लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. अनेक मंदिरांमध्ये होणारी गर्दी पाहता आता त्या मंदिरांमध्ये दर्शन वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शिर्डीतील साईबाबा मंदिरामागोमाग, आता जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये दर्शन वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.
 
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिर आता सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने 28 मार्च 2021 च्‍या कोविड- 19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना लागू केल्या. त्यानुसार आता जेजुरीत खंडोबाच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आले आहेत.
 
दरम्यान, भाविकांना दर्शनासाठी मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या वेळेत खुले राहणार आहे. या आधी दर्शनाची वेळ ही पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत होती. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे अशी माहिती मार्तंड देवस्थानकडून देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती