बीडमध्ये कोरोनाची अफवा पसरवणाऱ्या दोघा जणांविरोधात गुन्हा

सोमवार, 16 मार्च 2020 (16:51 IST)
बीडमध्ये ‘कोरोना’विषयी अफवा पसरवणाऱ्या दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी पुण्यातील अफवेखोरांवरही गुन्हा नोंदवण्यात आला होता. बीडमधील आष्टीत कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये अद्याप कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही.
 
पुण्यातील हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची खोटी माहिती पुण्याच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आली होती. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरांनी  अफवाखोरांना धडा शिकवण्याचा इशारा दिला होता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती