राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 38

सोमवार, 16 मार्च 2020 (16:46 IST)
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. आणखी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे राज्यात कोरोनाबाधितांची  संख्या 33 वरुन 38 वर गेली आहे. या चार कोरोनाबाधित रुग्णांपैकी तिघे मुंबईतील आहेत, एक नवी मुंबईतील आहे, तर एक यवतमाळ येथील आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 8 वर पोहोचली आहे. तर नवी मुंबईत आतापर्यंत तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर यवतमाळमध्येही आतापर्यंत तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.
 
“या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पण, आकडा वाढला आहे. हे सर्व रुग्ण कुटुंबातील किंवा जवळच्या संबंधातील आहेत. हाय रिस्कमधील आहेत. या चार कोरोनाबाधितांपैकी दोन जण हे एकाच कुटुंबातील आहेत. तर दोघे हे परदेशातून प्रवास करुन आले आहेत”, असंही राजेश टोपे म्हणाले.
 
“पनवेलमध्ये 33 जणांना वेगळं ठेवण्यात आलं आहे. जे नागरिक परदेश दौरा करुन आले आहेत, त्यांच्यात जर कोरोना संबंधित काही लक्षणं आढळली तर त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात येतं. पनवेलमध्येही या 33 जणांना याच कारणामुळे वेगळं ठेवण्यात आलं असून ते सर्व जण तिथेच आहेत”, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती