दै. सामनामध्ये नाणारची जाहीरात, कोकणातील जनता संभ्रमावस्थेत

शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (17:02 IST)
‘नाणार जाणार’, असे निवडणुकीपुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. लोकसभा आणि विधानसभेला नाणार प्रकल्प मागे घेण्याच्या अटीवरुनच शिवसेनेने भाजपशी युती केली होती. तसेच नाणारवासियांच्या आंदोलनाला देखील सेनेच्या स्थानिक नेत्यांनी वेळोवेळी पाठिंबा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे सरकारला १०० दिवस होत असतानाच दै. सामनामध्ये नाणारची वाहव्वा करणारी जाहीरात पहिल्या पानावर छापून आली आहे. ‘नाणार कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’, असे जाहीरातीचे शीर्षक असून सामनाच्या रत्नागिरी आवृत्तीमध्ये ही जाहीरात छापून आली आहे. 
 
सामना दैनिकाच्या कोकण आवृत्तीमध्ये रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहीरात छापून आली आहे. आता जाहीरात खुद्द सामनामध्येच आल्यानतंर आहे.
 
यावर खासदार विनायक राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र असले तरी ते वर्तमानपत्र आहे, त्यामुळे त्यांनी कोणत्या जाहीरात्या घ्याव्यात हा त्यांचा अधिकार आहे. मात्र सरकारन म्हणून आम्ही प्रकल्पाच्या विरोधात आहोत. जोपर्यत नाणारची स्थानिक जनता प्रकल्पाच्या समर्थनार्थ उतरत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प होणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती