सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा पुढे ढकलली

बुधवार, 20 मे 2020 (22:03 IST)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जानेवारी महिन्यात सेट 2020 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया राबविली होती. 18 जूनला प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) उपलब्ध करून दिले जाणार होते. महाराष्ट्र व गोवा राज्यात येत्या 28 जूनला सेट परीक्षा घेण्याचे नियोजित होते. परंतु कोव्हीड 19 अर्थात कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परीस्थितीच्या पार्श्‍वभुमीवर सेट परीक्षा पुढे ढकण्यात येत आहे.
 
या परीक्षेसाठी 1 लाख 11 हजार 106 पात्र परीक्षार्थींची यादी संकेतस्थळावर जारी केलेली होती. परीक्षेची सुधारीत तारीख सध्यातरी जाहीर करण्यात आलेली नाही. सेट परीक्षेचे नियोजन पुढील काळात परीस्थितीचा आढावा घेऊन करण्यात येईल, असे सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती