महाकाली गँगच्या मोरक्याचा खून, आरोपी १२ तासांत गजाआड

सोमवार, 18 मे 2020 (22:04 IST)
– पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ ची कारवाई
 
पिंपरी-चिंचवड पुनावळे येथील लंडन ब्रिज खाली महाकाली गँगचा मोरक्या मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद धकोडिया (वय-३०, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) याच्या खूनप्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हेशाखा युनिट-४ च्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या १२ तासांत गजाआड केले.
 
आदम उर्फ गोट्या मोहम्मद खान (वय-३२, रा. मूळ सोमाटणे फाटा, सध्या रा. पुनावळे स्माशानभूमी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, महाकाली गँगचा मोरक्या मनोज धकोडीया याची पत्नी पुनम धकोडीया हिने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या घटनेतील मयत मनोज धकोडीया हा महाकाली गँगचा मोरक्या राकेश फुलचंद धकोडीया याचा लहान भाउ आहे. २०११ मध्ये रामेश याचा एनकाउंटर झाला होता. त्यानंतर गँगची सूत्रे मनोजकडे आली होती. त्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे नोंद आहेत. त्याला २०१९ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्यात आले होता. दरम्यान, मनोज याचा खून झाल्याचे लक्षात येताच पिंपरी-चिंववड पोलीस आयुक्तांनी तातडीने तपास करण्याबाबत आदेश दिले होते.
 
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ मार्फत सदर प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळी व आजुबाजुच्या परिसरात कोणताही भौतिक अथवा तांत्रिक पुरावा मिळून येत नसल्याने सर्व खबऱ्यांना सतर्क करुन माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान, पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना त्यांचे बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पुनावळे स्माशानभूमी येथील झाडाखाली एक संशयित इसम झोपलेला असून, त्याने सदरचा प्रकार केला असण्याची दाट शक्यता आहे.
 
मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख यांनी पथकासह सदर संशयीत इसमास त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यास गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी-चिंचवड कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याचे नाव आदम उर्फ गोट्या मोहम्मद खान (वय-३२, मूळ रा. सोमाटणे फाटा., ता. मुळशी, जि. पुणे) असे असल्याचे समजले. त्याने दि. १७ मे २०२० रोजी सायंकाळी १० वाजताच्या दरम्यान तो आणि मयत दोघेजण लंडन ब्रिजखाली दारु पित असताना झालेल्या भांडणातून मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद धकोडीया हा दारु पिवून झोपलेला असतना त्याच्या डोक्यात बांबूने मारुन त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोप आदम उर्फ गोट्या मोहोम्मद खान याचेविरुद्ध घरफोडी, जबरी चोरी असे एकूण ९ गुन्हे दाखल असून सध्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
 
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, गुन्हे शाखा-२ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ चे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पो. हवा. संजय गवारे, नारायण जाधव, प्रविण दळे, धर्मराज आवटे, दादाभाउ पवार, अदिनाथ मिसाळ, पो. ना. मोहम्मद गौस नदाफ, लक्ष्मण आढारी, तुषार शेटे, संतोष असवले, वासुदेव मुंडे, पो. शि. शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती