UPSC परीक्षेचा निकाल जाहीर

मंगळवार, 16 एप्रिल 2024 (15:29 IST)
केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षा निकाल जाहीर केला असून यावर्षी परीक्षेमध्ये 1016 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच नागरी सेवा म्हणजे UPSC या परीक्षेमध्ये लखनऊचा आदित्य श्रीवास्तव पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच दुसरा क्रमांक अनिमेश प्रधानने मिळवला आहे. यावेळेस ST प्रवर्गातील 86 विद्यार्थी सर्वसाधारण गटामधील 374 विद्यार्थी, EWS प्रवर्गातील 115 विद्यार्थी तसेच OBC प्रवर्गातील 303 विद्यार्थी, SC प्रवर्गातील 165 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. 
 
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यामध्ये आदित्य श्रीवास्तवने प्रथम क्रमांक मिळवला आहे. पहिल्या टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये चार मुली आहेत.  तसेच UPSC च्या वेबसाईटवर हा निकाल पाहावयास मिळेल. 
 
एकूण 1016 विद्यार्थी UPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. UPSC हि परीक्षा IAS, IPS , IFS, साठी घेण्यात आली होती. तसेच आयोगाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी गोष्टीत केली आहे. या परीक्षेत टॉप 10 मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची नवे पुढीलप्रमाणे 
 
TOP 10 विद्यार्थी 
आदित्य श्रीवास्तव
अनिमेश प्रधान
दोनुरु अनन्या रेड्डी
पी. के सिद्धार्थ रामकुमार
रुहानी
सृष्टी डबास
अनमोल राठोड
आशीष कुमार
नौशीन
ऐश्वर्याम प्रजापती

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती