वर्षाच्या अखेरीपर्यंत व्हॉट्सअँप होणार बंद

व्हॉट्सअँप यूजर्ससाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत व्हॉट्सअँप ब्लॅकबेरी ओएसला सपोर्ट करणार नसल्याचे मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअँपने जाहीर केलेय. यात ब्लॅकबेरीचा लेटेस्ट व्हर्जन ब्लॅकबेरी 10चाही समावेश आहे. 
 
म्हणजेच पुढील वर्षापासून ब्लॅकबेरी ओएसवर चालणारे स्मार्टफोन वापरणार्‍यांना व्हॉट्सअँप वापरता येणार नाही. या यादीत केवळ ब्लॅकबेरीच नाही तर नोकियाच्या S40 सिरीज स्मार्टफोन, नोकिया सिम्बियन S60, अँड्रॉइड 2.1, अँड्रॉइड 2.2 आणि विंडोज फोन 7.1 यांचाही समावेश आहे. या सर्वावरही पुढील वर्षापासून व्हॉट्सअँप सपोर्ट बंद होईल. जर तुमच्याकडेही या प्लॅटफॉर्मवर चालणारे स्मार्टफोन आहेत तर नवे अँड्रॉइड, आयफोन आणि विंडोज फोन अपग्रेड करण्याची गरज आहे.

वेबदुनिया वर वाचा