कंकाल अवतारचा, बायकोने मित्राच्या मदतीने जंगलात हत्या करून जाळले

सहा दिवसांपूर्वी नैनीतालच्या सलडी भागात जळत्या कारमध्ये मृत सापडलेल्या अवतार सिंह यांचे देह त्यांच्या निवासस्थळी पाठवण्यात आले. सहा फुटाचा अवतार चार फुटाच्या गाठोडीत घरी पोहचला तर लोकांना त्याच्या बायकोच्या क्रूरतेवर हैराणी झाली. मृतदेहावर अंत्य संस्कार करण्यात आले.
 
चौकशीनंतर कळून आले होते की रुद्रपुर व्यापारी अवतार सिंह बेपत्ता नाही तर त्याचा खून करून कारमध्ये जाळले गेले होते. कारमध्ये सापडलेला हाडांचा सांगाडा अवतारचा होता. अवतारची हत्या त्याच्या पत्नी नीलमने आपल्या एका मित्र मनीष मिश्रा आणि एका बदमाशासोबत मिळून केली. जंगलात हत्येनंतर अंधार होयपर्यंत मृतदेह कारमध्ये फिरवण्यात आले नंतर आठ वाजता सलडीजवळ एकांत जागा बघून कारसमेत देह फुंकण्यात आली.
 
सूत्रांप्रमाणे नीलम आणि मनीष कधीचे हत्येच्या प्रयत्नात होते पण हिंमत होत नसल्यामुळे शेवटी त्यांनी गुन्हेगार प्रवृत्तीच्या एका मित्राची मदत घेतली. त्याने योजना आखली आणि आधी हत्या व नंतर कारला आग लावली.
 
पोलिसांना शंका येऊ नये म्हणून बायको कार मुखानी चौरस्त्यावर अशा जागी कार पार्क करून हॉस्पिटलचे चकरा लावत राहिली जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तेथून कार घेऊन मनीष नैनीतालकडे निघाला आणि तिसरा बदमाश दुसर्‍या कारने आला. दोघांनी अंधार व्हायची वाट बघितली आणि नंतर आठ वाजता कारला आग लावली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती