कुठे आहे मोदी यांच्या विजयाचे शिल्पकार अरुण जेटली

शुक्रवार, 24 मे 2019 (12:51 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाचे चक्रव्यूह तोडत लोकभसा निवडणुकीत 303 जागा मिळवून इतिहास रचला आहे. देशाच्या पश्चिम तथा उत्तरी भागातच नव्हे तर पूर्वी भागात देखील भगवा फडकत आहे. या विजयाच्या शिल्पकारांमध्ये एक नाव अरुण जेटली यांचे देखील आहे. भाजपच्या विजयात मोठी भूमिका साकारणारे अरुण जेटली पक्षाच्या महाविजयाच्या उत्सवात कुठे दिसत नव्हते. अशात हा प्रश्न साहजिक सर्वांच्या मनात येत होता की जेटली आहे कुठे ... 
 
मोदी आणि शहा जेव्हा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते तेव्हा जेटली दिल्लीत बसून व्हू रचना आखण्यात लागले होते. त्यांच्या मार्गदर्शनात पक्षाने कमजोर जागा शोधून त्यांना विजय मिळवण्याचे प्लॉन बनविले होते. जेटली सध्या आजारी आहे, पण अद्याप त्यांच्या आजारपणाचे वृत्त जाहीर करण्यात आले नाही आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार जेटली (66) मागील काही आठवड्यापासून कार्यालयात जात नव्हते आणि त्यांना उपचार व चाचण्यांसाठी एम्समध्ये भरती करण्यात आले होते. त्यांना गुरुवारी सुटी देण्यात आली होती. असे देखील सांगण्यात येत आहे की त्यांना लवकरच उपचारासाठी परदेशात घेऊन जाण्यात येत आहे.  
व्यवसायाने वकील जेटली यांना मोदी मंत्रिमंडळात सर्वात महत्त्वपूर्ण मंत्र्यांच्या यादीत सामील करण्यात येते. आजारपणामुळे जेटलीने यंदा लोकसभा निवडणुकीत भाग घेतला नाही. मागील वर्षी मे मध्ये जेटलीयांचे किडनी प्रत्यरोपण करण्यात आले होते.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती