प्रवेश मिळणार का ?

सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (09:40 IST)
सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरामध्ये सर्वच वयोगटातील महिलांना परवानगी देऊनही अजूनही प्रवेश मिळालेला नाही. मागील महिन्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पहिल्यांदाच शबरीमला मंदिर खूले करण्यात आले, पण अयप्पा भक्त आणि हिंदूत्ववादी संघटनांनी केलेल्या प्रचंड विरोधामुळे महिलांना मंदिर प्रवेश झालाच नाही.
 
त्यानंतर आज विशेष पूजेसाठी शबरीमला मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत. दरम्यान वार्तांकनासाठी महिला पत्रकारांना बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरात १४४ कलम लागू करत जमावबंदी केली आहे.  राज्य शासनाकडून २३०० पोलिसांचा फौडफाटा मंदिर परिसरात तैनात करण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती