संघाची तीन दिवसीय बैठकीत राम मंदिर मुद्दा प्रमुख चर्चेचा

मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (16:08 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक ३१ ऑक्टोबरपासून मुंबईत सुरू होत असून, मंगळवारी ३० ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय बैठकी विषयी विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. तीन दिवसीय बैठकीची रुपरेषा तयार करण्यात येतेय. या बैठकीत आरएसएसशी निगडीत ५४ संघटना सहभागी होणार आहेत. बैठकीत देशभरातून संघाचे पदादिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय बैठकीत राजकीय मुद्दे तर आहेतच सोबत अयोध्या राम मंदिर निर्माण, देशाची सुरक्षा, सीमा क्षेत्राचा विकास, नवीन शिक्षण नीति तसंच स्वदेशी वस्तुंचं निर्माण यांसारख्या अनेक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र बैठकीतला प्रमुख मुद्दा असेल तो राम मंदिराचा असणार आहे. या अखिल भारतीय कार्यकारिणी बैठकीला दिवाळी बैठकही संबोधण्यात येतं. या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह सुरेश जोशी, उपाख्य भैयाजी, सह-सरकार्यवाह सुरेश सोनी, डॉ. कृष्ण गोपाल, दत्तात्रय होसबले, व्ही. भागय्या, डॉ. मनमोहन वैद्य यांच्यसोबतच देशभरातील ३०० प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती