रामदेव बाबांचे आले कपडे, संस्कार, परिधान आणि आस्था

सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (16:19 IST)
योग गुरु रामदेव बाबा यांनी आता कपडे उत्पादनात पाय रोवले असून, त्यांचा दुकान सुरु झाले आहे. धनोत्रयदशीच्या शुभमुहूर्तावर बाबा रामदेव यांनी दिल्लीत नेताजी सुभाष या भागात पतंजली ‘परिधान’ या रेडीमेड कपड्यांच्या शोरुमचे उद्धघाटन केले. यावेळी प्रसिद्ध पैलवान सुशील कुमार, फिल्म निर्माते मधुर भांडारकर हे देखील उपस्थित होते. पतंजली परिधानच्या या शोरुममध्ये 3 हजार प्रकारचे कपडे विक्रीस असून, देशी कपड्यांपासून पाश्चिमात्य कपड्यांचा समावेश आहे. तसेच आधुनिक डिझाईनचे कृत्रिम दागिनेही या शोरुममध्ये मिळणार आहेत. सध्या दिवाळीची धूम सुरू असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पतंजलीने कपड्यांवर 25 टक्के सूट ठेवली आहे.पुरुषांच्या सर्वप्रकारच्या कपड्यांना ‘संस्कार’ नाव देण्यात आले असून महिलांच्या कपड्यांना ‘आस्था’ हे नाव देण्यात आले आहे. पुरुषांच्या कपड्यांमध्ये अंतरवस्त्रांपासून स्पोर्टस वेअर, तर महिलांच्या कपड्यांमध्येही सर्व प्रकारचे कपडे पतंजली परिधान शोरुममध्ये मिळणार आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती